मुंबई Ashish Shelar On Uddhav Thackeray:राष्ट्रपती मुर्मू यांना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राविषयी बोलताना शेलार म्हणाले की, सकाळी लवकर उठल्यामुळं त्यांची डोळ्यावरची झोप गेली नसावी, म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दामहून अडचणीत आणणारी आणि चुकीची असावी. शुक्रवारी देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेनं निमंत्रण दिलं आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळं निमंत्रण राष्ट्रपतींना यापूर्वीच पोचलं आहे.
एकनाथ खडसे यांना स्मृतीभ्रंश : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले की, एकनाथ खडसे यांना तिकडे गेल्यावर स्मृतिभ्रंश झाला असावा. त्यांनी टीका जरूर करावी पण त्या टीकेत तथ्य असू द्या.
महायुतीचे मेळावे: महायुतीचा मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. तर उपनगरातील दुसरा मेळावा वांद्रे येथे रंग शारदात होणार आहे. महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
उद्धवजी तुम्ही घरंदाज कसे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची अजून पातळी नाही. उद्धव ठाकरे स्वतःला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील तर त्यांना माझा सवाल आहे की, उद्धवजी जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून बाहेर काढलं, चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, जर वडिलांच्या संपत्तीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते तर, तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असंही शेलार यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- काळाराम मंदिरात ठाकरे गटाकडून होणार 'महाआरती', कार्यक्रमाचं थेट राष्ट्रपतींना निमंत्रण
- उद्धव ठाकरेंनी घरी बसून निबंध लिहावा, देवेंद्र फडणवीस यांची टीका
- ठाकरे गटाकडून अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार, जाणून घ्या कारण