महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरशांमध्ये किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा' - mumbai university

या प्रशिक्षणाबाबत फेरविचार व्हावा, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. रजा अकादमीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांनी 'रामभाऊ म्हाळगी'प्रबोधिनीतील प्रशिक्षण रद्द करणे वैचारिक दिवाळखोरी असल्याचा आरोप शेलार यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

Ashish shelar
आशिष शेलार, भाजप नेते

By

Published : Feb 2, 2020, 1:35 PM IST

Updated : Feb 2, 2020, 4:24 PM IST

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाईंदरच्या 'रामभाऊ प्रबोधिनी'मधील मुंबई विद्यापीठातील ३० अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शनिवारी अर्ध्यावर रोखण्यात आले. यावर आज भाजपकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. 'म्हाळगीमधील प्रशिक्षण नको असेल, तर सरकारी प्रशिक्षणे एक तर मदरशांमधे किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा, अशी टीका भाजप नेते आशिष शेलारांनी केली आहे.

आशिष शेलारांचे ट्वीट

हेही वाचा -अर्थसंकल्पाकडून 'आरएसएस'ला काय हवं? पाहा...

या प्रशिक्षणाबाबत फेरविचार व्हावा, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. रजा अकादमीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या लोकांनी 'रामभाऊ म्हाळगी'प्रबोधिनीतील प्रशिक्षण रद्द करणे वैचारिक दिवाळखोरी असल्याचा आरोप शेलार यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

हेही वाचा - संघाच्या प्रबोधिनीकडून मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, सातव यांचा आक्षेप

'मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेत ते तातडीने रद्द केले. ही बाब अत्यंत खेदजनक असून पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक अस्पृश्यता दाखवून देणारी आहे. वैचारिक अस्पृश्यतेसोबत जागेची अस्पृश्यताही आता मानत असाल, तर विधानसभेत ज्या बाकांवर आपण सत्ताधारी म्हणून बसला आहात त्याच जागेवर संघ विचारांचे आम्ही सगळे यापूर्वी बसलो होतो. त्यामुळे ती बाकेही हवी तर धुवून, पुसून घ्या. ज्या काँग्रेसच्या माजी खासदारांनी ही वैचारिक अस्पृश्यता दाखवली त्यांना सरकारतर्फे वैचारिक दिवाळखोरीचा पुरस्कार द्या,' अशी टीका पत्रामध्ये करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचा निषेध करत असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले.

या प्रशिक्षणाबाबत फेरविचार व्हावा, अशा आशयाचे पत्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.

हेही वाचा - माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; महिला तहसीलदाराला म्हणाले...

Last Updated : Feb 2, 2020, 4:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details