मुंबई- मुकेश अंबानी जर काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत असतील तर काँग्रेस अंबानींचे सरकार आणू पाहत आहे का? असा सवाल भाजपने केला आहे. मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांत फिरत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस देशात अंबानींचे सरकार आणू पाहत आहे का? भाजपचा सवाल - election
उद्योजक अनिल अंबानी यांनी काँग्रेस उमेदवरा मिलिंद देवरा यांची स्तुती करणारा एक व्हिडिओ तयार केला होता. देवरा यांनी तो व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवरून प्रसिध्द केला होता.
आशिष शेलारांची काँग्रेसवर टीका
शेलार पुढे म्हणाले की, भाजपने कधीही बिजनेस हाऊसच्या समर्थनाने निवडणुका जिंकल्या नाहीत. ही भाजपची संस्कृती नाही. पण भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसलाच आता बिजनेस हाऊसची गरज असल्याचे चित्र आहे. भाजपला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थ नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे भाजपला कोणत्याही बिजनेस हाऊसची गरज नाही. पण काँग्रेसला काय पाहिजे, हे जनतेला आता कळले असल्याचा टोला शेलार यांनी लगावला.