महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोज नवे यूटर्न.. सत्तेसाठी काँग्रेसचे हमाल दे धमाल; आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका - ashish ashelar tweet news

देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते.

ashish-shelar-comment-on-shivsena
आशिष शेलार

By

Published : Dec 12, 2019, 12:55 PM IST

मुंबई- पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे विधेयक काल (बुधवारी) मुंजूर झाले. यासाठी राज्यसभेत मतदान घेण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या खासदारांनी यावेळी सभात्याग केला. त्यामुळे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला. शेलार यांनी ‘रोज नवे यूटर्न..सत्तेसाठी पाहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!’ म्हणत ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

हेही वाचा-जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र? २५० जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे यूटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल, असे म्हणत शेलार शिवसेनेवर हल्लाबोल केला.

तसेच शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपामुळेच झाले असेही त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details