मुंबई -कृपया सर्व गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीही मंडपाची परवानगी पालिकेकडून घ्यावी. गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची की नाही, हा निर्णय तुमचा आहे. पण परवानगी घ्या. न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेने स्वतःहून सर्व गणेश मंडळांना पत्र देत परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत केली आहे. तसेच त्यांनी गणेशोत्सव मंडळ परवानगी अर्जांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.
'गणेशोत्सव मंडळ परवानगी अर्जांची संख्या चिंताजनक'
दरवर्षी गणेशोत्सव मंडळे मुंबई महापालिकेकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करत असतात. दरवर्षी १२ हजाराच्यावर अर्ज येत असतात. पण यंदा करोनाचे संकट असल्याने केवळ ६०० ते ६५० अर्ज आले आहेत. ही बाब चिंताजनक आहे, असे ट्वीट भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.
दरवर्षी गणेशोत्सव मंडळे मुंबई महापालिकेकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करत असतात. दरवर्षी १२ हजाराच्यावर अर्ज येत असतात. पण यंदा करोनाचे संकट असल्याने केवळ ६०० ते ६५० अर्ज आले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. गणेशोत्सव साजरा करा अथवा नका करू, पण यंदाही मंडपासाठी परवानगी घ्या, असे सांगतानाच गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मंडपाच्या परवानग्यांकरीता मोठा न्यायालयीन संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी परंपरा आणि सातत्य या मुद्द्यावर मंडळांना परवानग्या देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ही परंपरा आणि सातत्य खंडित होऊ द्यायचे नसेल तर सर्व मंडळांनी मंडपाची परवानगी घ्यावी, नाही तर पुढच्या वर्षी अडचणी निर्माण होऊ शकतात. न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकार सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत बोटचेपे धोरण का घेत आहे. ठाकरे सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी न्यायालयात लढा झाला तो माहित देखील नाही. गणेशोत्सवाचा न्यायालयीन लढा सातत्य, परंपरा यावरूनच न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी दिली. त्यामुळे सर्व सार्वजनिक मंडळांनी परवानगी घ्यायला हवी. तसेच गेल्या वर्षीच्या आकड्यांनुसार महापालिकेनेच सर्व गणेश मंडळांना स्वतःहून पत्र देत परवानगी द्यावी, अशी विनंती शेलार यांनी पालिकेला केली आहे.