महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेटली यांच्या निधनाने देशाची मोठी हानी - राज्यपाल विद्यासागर राव - arun jaitley

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्याकडे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. या मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा आपल्याला बहुमान मिळाला. जेटली हे त्यांच्यासोबत काम करणार्‍या सर्वांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

राज्यपाल चे. विद्यासागर राव वमाजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

By

Published : Aug 24, 2019, 4:34 PM IST

मुंबई- माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे देशातील एक द्रष्टे, मुत्सद्दी कायदेतज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते. अमोघ वक्तृत्व लाभलेले जेटली हे राष्ट्राकरीता अनमोल रत्न असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले. अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जेटली यांनी केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट, वाणिज्य, उद्योग यांसह इतर अनेक मंत्रालयांचा कारभार सांभाळला आहे. ते करतांना त्यांनी आपल्या कामकाजाचे मापदंड निर्माण केले. त्यांनी जनसामान्यांच्या हितासाठी पथदर्शी निर्णय घेतेले, असे करताना त्यांनी उद्योग व व्यवसायाच्या वाढीसाठी देखील पूरक निर्णय घेतले.

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्याकडे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. या मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा आपल्याला बहुमान मिळाला. जेटली हे त्यांच्यासोबत काम करणार्‍या सर्वांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details