मुंबई-राज्यावर कोरोना संकट उभे असताना पोलीस बांधव स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून नागरिकांना नियम पाळा व हे संकट आपल्यापासून दूर करण्याचे आवाहन करीत आहेत.प्रसिद्ध पोर्टेट कलाकार चेतन राऊत यांनी महाराष्ट्र पोलिसाचे 4860 पुश पिनच्या सहा रंगाच्या छटाच्या साहाय्याने चित्र रेखाटून त्यांच्या कार्याचे आभार मानले.
देशात कोरोना रुग्णाची संख्या वेगात वाढत असताना याचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. यातच राज्यातील रुग्ण पैकी 60 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने सर्वच यंत्रणेवर ताण पडतो आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील लॉकडॉऊन कालावधी 30 एप्रिल पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. पवई येथील रहिवासी असलेले आणि जेजे स्कुल ऑफ आर्टचे विद्यार्थी असलेले चेतन राऊत यांनी अनोख्या पद्धतीने कलेतून महाराष्ट्र पोलिसाना मानवंदना दिली आहे. चेतनने घरातच पुश पिनच्या सहाय्याने मुंबई पोलिसांच्या एका हवालदाराचे सुंदर असे पोट्रेट तयार केले आहे.