मुंबई -कुलाबा परिसरांमध्ये परदेशी पर्यटकांसाठी चरस पुरवण्याचे काम करणाऱ्या टूरिस्ट गाईडला अटक करण्यात आली आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. निसार अहमद अब्दुल सत्तार (वय 36) असे या आरोपीचे नाव आहे.
निसार अहमद अब्दुल सत्तार हा आरोपी कुर्ला परिसरांमध्ये चरस घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले असता, त्याच्या अंगझडती मधून 800 ग्राम चरस मिळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत जवळपास चार लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.