महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Avinash Bhosale : अविनाश भोसले यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात शाही उपचार? मुश्रीफांनी दिले चौकशीचे आदेश

उद्योगपती अविनाश भोसले यांच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पंचतारांकित सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आलीय. मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Avinash Bhosale
Avinash Bhosale

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 7:54 PM IST

मुंबई : डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले वाधवान बंधू यांना केईएम रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली सोयी सुविधा पुरवल्या जात होत्या. त्यामुळं तुरुंगात काम करणाऱ्या पोलिसाचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर ड्रग्ज माफिया ललित पाटील हा देखील ससून रुग्णालयात नऊ महिने दाखल होता. त्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. सध्या तो साकीनाका पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे. या दोन प्रकरणानंतर आता डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यात अटकेत असलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पंचतारांकित सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आलीय. मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं 'हे' सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

चौकशीचे आदेश : मनी लाँड्रिंगप्रकरणी सीबीआय, ईडीनं अटक केलेले प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले आगोदर जे. जे. रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना आता सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भोसले गेल्या 10 महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना रुग्णालयात पंचतारांकित सुविधा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार उपचार : मात्र, चौकशीच्या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत पोहचली नसल्याचं सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं आहे. त्याचप्रमाणं गेल्या तीन महिन्यापासून अविनाश भोसले हे सेंट जॉर्ज रुग्णालयात न्यायबंदी कैदी म्हणून दाखल असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. अविनाश भोसले यांना ह्रदयविकाराचा त्रास, रक्तदाबाचा त्रास, तसंच फुफ्फुसाचा त्रास असल्यानं सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं दिलंय. तसंच न्यायालयाच्या आदेशानुसार अजूनही अविनाश भोसले उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.



भोसलेंना शाही सुविधा :तर, दुसरीकडे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्याचप्रमाणं राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांना ईटीव्ही भारतनं अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र, माझ्याकडे माहिती नसून तुम्ही आर्थर रोड कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती विचारा, असं गुप्ता यांनी सांगितलं. अविनाश भोसले यांना फक्त 700 रुपये मोजून सर्व शाही सुविधा मिळत असल्याची माहिती उघड झाल्यामुळं वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -

  1. Industrialist Avinash Bhosale : सीबीआयची मागणी फेटाळली! उद्योगपती अविनाश भोसलेंना आरोग्य तपासणी करून तुरुंगात पाठवा; सत्र न्यायालयचे निर्देश
  2. Yes Bank DHFL Scam : लष्करी डॉक्टर पथकाकडून अविनाश भोसलेंच्या तपासणीवर सीबीआय ठाम, जे जे आणि सेंट जॉर्ज डॉक्टरांच्या अहवालावर आक्षेप
  3. Charge Sheet Against Amit Bhosle: उद्योगपती अविनाश भोसलेंच्या मुलाविरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details