महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Grampachayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली, 2 डिसेंबर पर्यंत भरता येणार अर्ज - मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 30

निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवली (Application deadline extended for gram panchayat elections) असल्याची माहिती आहे.

Grampachayat
Grampachayat

By

Published : Dec 1, 2022, 5:02 PM IST

मुंबई :ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे. आयोगाची वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अडचणी होत असून विलंब होतो आहे. नामाकंन अर्ज ऑफलाईन पध्दतीने भरण्यास परवानगी आणि वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली जात होती. राज्य निवडणूक आयोगाने ही बाब लक्षात घेत, दोन डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून (Application deadline extended for gram panchayat elections) देण्यात आली आहे.

अर्ज ऑफलाइन भरता येणार : ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार धावपळ करताना दिसतायेत. मात्र, निवडणूक आयोगाची (Election commission) वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी दिली आहे.

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज दिली.

राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details