मद्य धोरणावर मंत्री मुनगंटीवार यांचा बचावात्मक पवित्रा मुंबई :दिल्लीचे आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य धोरणात बदल केल्याप्रकरणी सीबीआय कोठडीत जावे लागले आहे. यावरून भाजप नेते, आमदार आशीष शेलार यांनी दिल्लीच्या मद्य धोरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात असल्याचे सांगत याची सुद्धा सीबीआय चौकशी करण्यात यावी ही मागणी केली आहे. परंतु या मद्य धोरणावर बोलताना भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीचे मद्य धोरण हे मोठे स्कँडल असल्याचे सांगत महाराष्ट्रात तसे काही आढळल्यास त्याचीही चौकशी केली जाईल असे सांगितले आहे. विधान भवनात ते बोलत होते.
केजरीवाल - ठाकरे भेट, सिसोदिया यांना अटक? : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी २४ फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्याच्या दोन दिवसानंतर २६ फेब्रुवारीला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य धोरणात बदल केल्याबद्दल सीबीआय ने अटक केली. या अटकेनंतर बोलताना भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिल्लीच्यामध्ये धोरणाचे धागेदोरे महाराष्ट्र पर्यंत असून महाराष्ट्रातील मध्यवर्ती सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सीबीआय चौकशी करण्याची मागणी :या चौकशी मागे हेतू हाच आहे की महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मागच्या वर्षी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात २० वर्षानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मद्य धोरणात बदल करून विशेषतः किराणा दुकान, सुपर मार्केट, मॉलमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली. तसेच विदेशी दारूवरील ३०० टक्के आयात कर १५० टक्क्यावर आणला. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत दिली, त्याने दारू व्यवसायिकांचे भले करण्याचे काम त्यांनी केले आहे. म्हणून ही जी सवलतीची खैरात झाली आहे ते दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात आहे. म्हणून याची सुद्धा सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दिल्लीचे मद्य स्कँडल मोठे :याविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, १९२३ मध्ये महात्मा गांधीजी यांनी जो लेख लिहिला तो काँग्रेस ने वाचला पाहिजे. त्यामध्ये मी दारू पिणार नाही, मद्याला हात लावणार नाही, असे सांगितले होते. याचा आज काँग्रेसला विसर पडला आहे. महाविकास आघाडीमध्ये आल्यावर काँग्रेसला या गोष्टींचा विसर पडला आहे. त्यांनी त्यांच्या काळात ५ निर्णय घेतले. त्यामध्ये विदेशी दारूवरील ३०० टक्के कर १५० टक्क्यांवर आणला. किराणा दुकान, सुपर मार्केट, मॉल यामध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली. हजार फूट जागेत पीयो वाइन रहो फाईन हे धोरण सरकारने अवलंबले.
मद्य धोरणात आक्षेप असेल तर चौकशी :मंदिरे उघडल्याने करोना होतो, पण बियर बार उघडल्याने करोना होत नाही, असा संदेश करोना विषाणूने यांच्या काळात दिला होता. अशी मिश्किल टीपणीही त्यांनी केली. महाराष्ट्रात मद्य धोरणात काही आक्षेप असेल तर चौकशी नक्कीच होईल. पण दिल्लीचे मद्य धोरण पूर्णपणे वेगळे आहे. तिथे मोठ्या प्रमाणात स्कँडल झाले आहे. तिथे मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय :मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर आशिष शेलार यांनी दिल्ली मद्य धोरणाचे धागेदोरे महाराष्ट्र पर्यंत असल्याचे सांगत याच्या सीबीआय चौकशी मागणी जरी केली. तरीसुद्धा अर्थमंत्री राहिलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी थोडा सावध पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात चंद्रपूरमध्ये असलेली दारूबंदी सुद्धा हटवण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वायनरी चालत असल्याने वाईन संदर्भात फळ उत्पादन शेतकऱ्यांचे हित बघता वाईनला सवलत दिली गेली. यामुळे राज्याच्या महसुलात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय बदल्यास कदाचित त्याचे उलटे परिणाम दिसण्याचीही शक्यता असल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबत आस्ते कदम ठेवला आहे असे दिसते.
हेही वाचा -Three States Election Results : नागालँड, त्रिपुरामध्ये भाजपची घरवापसी; ईशान्येची वाटचाल विकासाकडे - पंतप्रधान मोदी