मुंबई - राज्यात कोरोना महामारी अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन तुर्तास हटवला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. यावेळी पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होत नाही. यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली, याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. सहा महिन्याच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही.