मुंबई- सर्वच राजकीय पक्षांमध्ये भ्रष्ट आणि गुन्हेगारी वृत्तीच्या राजकारण्यांना प्राधान्याने तिकिटे वाटली जातात. त्यामुळे स्वच्छ चारित्र्यांच्या उमेदवारांचा आग्रह धरून भविष्यातील स्वच्छ राजकारणासाठी मतदारांनी यावेळी 'नोटा'चा (नन ऑफ दि अबोव्ह) मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे.
स्वच्छ राजकारणासाठी 'नोटा'चा वापर करावा; अंजली दमानियांचे नागरिकांना आवाहन - गुन्हेगारी वृत्ती
दमानिया ईटिव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, की विजयी उमेदवारापेक्षा अधिक 'नोटा' मतदान झाल्यास पुर्ननिवडणुकीच्या भितीने सर्व राजकीय पक्ष स्वच्छ उमेदवार देतील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत असा प्रचार करणार आहे.
दमानिया ईटिव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, की विजयी उमेदवारापेक्षा अधिक 'नोटा' मतदान झाल्यास पुर्ननिवडणुकीच्या भितीने सर्व राजकीय पक्ष स्वच्छ उमेदवार देतील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत असा प्रचार करणार आहे. गेल्या ७० वर्षांत एकाही राजकीय पक्षाने सर्वसामान्यांचे राहणीमान उंचावे, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आजवर प्रयत्न केले नाहीत. तसेच, पाणीटंचाई, कुपोषण, बालमृत्यू अशा अनेक महत्त्वाच्या समस्या आजही 'जैसे थे' स्थितीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांनी आपल्याला मिळालेल्या नकाराधिकाराचा म्हणजेच नोटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून या प्रस्थापित राज्यकर्त्यांना धडा शिकवावा, असे दमानिया म्हणाल्या.
निवडणुकीत विजयी उमेदवारापेक्षा अधिक 'नोटा' मतदान झाल्यास पुर्ननिवडणूक होईल. पुन्हा निवडणूक खर्चाच्या भितीने सर्व राजकीय पक्ष स्वच्छ उमेदवार देतील. परिणामी राजकारण स्वच्छ होऊन लोकशाही सक्षम होईल, असेही दमानिया म्हणाल्या.