मुंबई- दुष्काळावर उपाययोजना म्हणून शासनाने गावोगावी पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. पाण्याबरोबरच चारा टंचाईही मोठया प्रमाणात निर्माण झाली असल्याने शासनाने पशुधन वाचविण्यासाठी १ ऑगस्ट पर्यंत चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुष्काळ सुरुच; चारा छावण्या १ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार, पशुधन वाचवण्यासाठी सरकारचा निर्णय - drought in maharastra
टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत दिली.

याबरोबरच टँकर्स आणि विहीर अधिग्रहण करण्याचे अधिकार संबधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत दिली. पशुधन जगविण्यासाठी छावण्या ३० जूनपर्यंत सुरु राहाणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, अद्याप पावसाने दुष्काळी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
आजमितीस जिल्हाभरात दुष्काळी भागात चारा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी पाऊस झाला, त्या ठिकाणी चारा उपलब्ध होण्यास आणखी महिन्याभराचा तरी अवधी लागणार आहे. पाऊस पडून, समाधानकारक चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या काही अटी आणि शर्तीनुसार सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.