मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांनी चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) सुरू असलेल्या चौकशी दरम्यान परमबीर सिंह ( Param Bir Singh ) यांच्या संदर्भातील 'परम'सत्य रेकॉर्डवर आणण्यासाठी मला काही गोष्टी आयोगासमोर सांगायचे आहे. त्या सांगण्याची विनंती आयोगाला केली होती. आयोगाने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याबाबत सांगितले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी वकिलामार्फत चांदीवाल आयोगासमोर आज (दि. २५ जानेवारी) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार, फेब्रुवारी, 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण ( Antilia Bomb Case ) आणि त्यानंतर मनसुख हिरेन ( Mansukh Hiren Murder Case ) यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्या ब्रीफिंगमध्ये महाराष्ट्र सरकारची दिशाभूल केली होती, असे देशमुख म्हणाले.
‘ते’ कधीतरी रेकॉर्डवर आणले पाहिजे - आपल्याला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने ( Anti Terrorist Squad ) तयार केलेली कागदपत्रे हवे होते. त्यांनी काही कागदपत्रे गोळा केली आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांसमोर हजर केले. संपूर्ण सत्य कागदपत्रांमध्ये आहे, ज्यामुळे संपूर्ण सत्य समोर येईल, असे अनिल देशमुख यांचे प्रतिनिधित्व करणारे अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी आयोगाला सांगितले. मी गृहमंत्री असताना एटीएसने गोळा केलेली काही कागदपत्रे आम्हाला दिली होती. सिंह कशी दिशाभूल करत होते. हे कधीतरी रेकॉर्डवर आणले पाहिजे. म्हणून मी आज आयोगाला हे सांगत आहे. साक्षीदार म्हणून उभे असताना अनिल देशमुख यांनी आयोगाला सांगितले.