मुंबई -मेट्रो २ अ आणि ७ या ३५ किमी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मेट्रोमधून प्रवास करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजल्यापासून रात्री ७.३० वाजेपर्यंत अंधेरी ते घाटकोपर मेट्रो १ सेवा बंद राहणार आहे. प्रशासनिक कारणामुळे ही सेवा बंद राहणार आहे. या कालावधीत मेट्रो बंद राहणार असल्याने त्याची नोंद घेऊन या कालावधीत प्रवाशांनी आपला प्रवास करावा. सुमारे दोन तास मेट्रो सेवा बंद राहणार असल्याने त्या कालावधीत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल मेट्रो प्रशासनाने आहे.
Mumbai Metro Service : मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी; पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान मेट्रोची सेवा 'या' वेळेत असणार बंद - मुंबई मेट्रो 19 जानेवारीला बंद
पंतप्रधान गुरुवारी १९ जानेवारीला मुंबईला भेट देत आहेत. या दरम्यान ते मुंबईमधील मेट्रो २ अ आणि ७ या ३५ किमी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच विविध कामांचे भूमिपूजन करणार आहेत. यामुळे या भेटी दरम्यान घाटकोपर ते अंधेरी मेट्रो १ ची सेवा सुमारे २ तास बंद राहणार आहे. याची नोंद घेऊन प्रवाशांनी आपला प्रवास करावा असे आवाहन मेट्रो रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सीएसएमटी स्थानकाचे सुशोभीकरण -आशिया खंडात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. मुंबईत बोरीबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे मुख्यालय बांधण्यात आले आहे. सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफेटेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के आणि खासगीची ६० टक्के गुंतवणूक असेल. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पासाठी जवळपास १ हजार ३५० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. सीएसएमटी इमारतीचा जीर्णोद्धार आणि विकासाचे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र हेरिटेज कन्झरव्हेटिव्ह समितीची मंजुरी मिळाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिकेच्या या कामाचे भूमिपूजन -पंतप्रधान आपल्या मुंबई भेटीदरम्यान धारावी आर्थिक केंद्राच्या भूमिपूजनासह विकासकामांचे उद्घाटन करतील. सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्टेशनदरम्यान, नवी मुंबई मेट्रोच्या ५.९६ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय २८ हजार कोटी रुपयांच्या ७ सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान करतील. तसेच गोरेगाव, ओशिवारा आणि भांडुप येथील तीन रुग्णालयांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम यावेळी होईल. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौ-याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीची चाहूल असल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.