नवी दिल्ली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. दिल्ली येथे रिपब्लिकन सेनेने सात उमेदवार उभे केले होते. हे सात उमेदवारही त्यांनी मागे घेतले असून त्यांच्या उमेदवारांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांचा दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत युती केली नव्हती. त्यांची भूमिका ही काँग्रेस विरोधातच असताना त्यांच्या बंधूनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.
आनंदराज आंबेडकर
आनंदराज आंबेडकर यांनी दिल्ली येथे काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे ट्विट दिल्ली काँग्रेसने केले आहे. शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.
Last Updated : May 5, 2019, 12:04 PM IST