महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पराभव समोर दिसत असल्याने मोदी मर्यादा सोडत आहेत; आनंद शर्मा यांचा आरोप - apoition

देशात मोदी हे २३ मे नंतर असतील का?, त्यांचा धमकी देण्याची वेळ गेली आहे. कोण जेलमध्ये जाणे आहे हे नंतर कळणार आहे. त्यांनी कटू भाषेत न बोलता त्यांनी ५ वर्षांपूर्वी दिलेले आश्वासने पूर्ण केले का हे सांगावे.

पराभव समोर दिसत असल्याने मोदी मर्यादा सोडत आहेत

By

Published : Apr 5, 2019, 10:37 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच वर्षांपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना विकासाचे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे प्रश्न विचारत असल्याने ते आपल्या पदाची मर्यादा सोडून बोलत आहेत. एक पंतप्रधान असा विरोधकांना बोलू शकतो, हेच देशाचे दुर्दैव असल्याची खंत काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली.

पराभव समोर दिसत असल्याने मोदी मर्यादा सोडत आहेत


मुंबईत वरळी येथे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. आम्ही पाच वर्षांपुर्वी २ ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी सोडून गेलो होतो, त्याचे त्यांनी काय केले? भाजपकडून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जात आहे. त्यावर शर्मा म्हणाले की, देशात मोदी हे २३ मे नंतर असतील का?, त्यांचा धमकी देण्याची वेळ गेली आहे. कोण जेलमध्ये जाणे आहे हे नंतर कळणार आहे. त्यांनी कटू भाषेत न बोलता त्यांनी ५ वर्षांपूर्वी दिलेले आश्वासने पूर्ण केले का हे सांगावे. आम्ही ज्या खुलेपणाणे बोलतो तसे त्यांनी त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन बोलावे. त्यासाठी ठरलेल्या मुलाखती न देता पत्रकार परिषदेत येऊन बोलावे, असे आव्हानही शर्मा यांनी मोदींना दिले.


मोदींनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. गुंतवणूक, निर्मिती, नवे कारखाने लागणे, निर्यात या चारही आघाड्यांवर आपली अर्थव्यवस्था ठप्प आहे. निर्यात घसरली आहे. जे कारखाने आधी स्थापन झाले त्यांची एक तृतीयांश क्षमता वापरली जात नाही. देशात सर्वात मोठा विषय नोकरी, बेरोजगारी, शेतकरी, सुरक्षा, मूलभूत अधिकार हे आहेत. नवीन गुंतवणूक होत नाही, उद्योगांना कर्ज मिळत नाही, बँकाकडे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत अशा स्थितीत मोदींना देशाला आणून सोडले आहेत. त्यामुळे आम्ही प्रश्न उपस्थित करतोय, त्यावर मोदी आपली मर्यादा सोडून बोलत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.


देशातील गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी ५ कोटी कुटुंबातील लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढणार आहोत त्यांना महिन्या ६ हजार आणि वर्षाला ७२ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यार आहोत. आमचा फोकस विकास, शेतकऱ्यांना दिलासा, शिक्षण, रोजगार असल्याचेही शर्मा म्हणाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृपाशंकरसिंह, मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, उर्मिला मातोंडकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष व उमेदवार मिलिंद देवरा हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details