मुंबई- दिवाळी जरी संपली असली तरी दिवाळीचा उत्साह मात्र आठवडाभर कायम असतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पश्चिम उपनगरातील शाखेतर्फे यावर्षी फटाक्यांऐवजी फराळ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
वातावरण प्रदूषित करणारे, प्राणी, पक्षी, मुले, वृद्धांना जीवघेणे ठरणारे व पर्यावरणाचा ऱ्हास करणारे फटाके न वाजवता त्याऐवजी तेवढ्या पैशाचा दिवाळीचा फराळ गरिबांसाठी दान करावे, असे अंनिसने नागरिकांना आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी स्वईच्छेने फोन करून आपले फराळ देत या उपक्रमात सहभाग नोंदवला.