मुंबई- युतीमधील शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपणच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येऊ, असे घोषित केले आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री कोण हे जनताच ठरवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे, अशी प्रतिक्रिया देऊन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर तर, आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली.
राज्याचा मुख्यमंत्री कोण हे जनताच ठरवेल - अमृता फडणवीस - Ajeykumar Jadhav
मुख्यमंत्री जनताच ठरवेल, अशी प्रतिक्रीया अमृता फडणवीस यांनी केली
कार्डिफ होमलेस विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुष आणि महिला संघाला अमृता फडणवीस यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना एकीकडे मुख्यमंत्रीपदी मीच निवडून येणार असे मुख्यमंत्री सांगत असले. तरी आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत बोलताना येत्या काळात आणखी काही नावे मुख्यमंत्री पदासाठी समोर येतील. त्यात काही नवीन नावेही असतील, असे सांगत आदित्य ठाकरे यांचीही खिल्ली उडवली.