महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हटल्याने अमृता फडणवीस ट्रोल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस

एक ट्वीट सोशल मीडियावर सध्या चांगलचं व्हायरल होत आहे. ते ट्वीट आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे. त्यांनी मोदींना शुभेच्छा देताना 'राष्ट्रपिता' असा उल्लेख केला आहे. या त्यांच्या ट्वीटमुळे सध्या त्या चांगल्याच ट्रोल होत असल्याचे दिसत आहे.

अमृता फडणवीस

By

Published : Sep 18, 2019, 4:01 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंगळवारी (१७ सप्टेंबर) वाढदिवस झाला. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये एक ट्वीट सोशल मीडियावर सध्या चांगलचं व्हायरल होत आहे. ते ट्वीट आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे. त्यांनी मोदींना शुभेच्छा देताना 'राष्ट्रपिता' असा उल्लेख केला आहे. या त्यांच्या ट्वीटमुळे सध्या त्या चांगल्याच ट्रोल होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: आईचा आशीर्वाद, सोबत जेवण, मोदींनी असा साजरा केला वाढदिवस

अमृता फडणवीस यांच्या ट्वीटनंतर समाज माध्यमातून त्यांच्यावर टीका होत आहे. महात्मा गांधी हेच फक्त देशाचे महात्मा गांधी आहेत. मोदी देशाचे पिता केव्हा झाले असा सवालही अनेकांनी केला आहे. 'मिट्टी के सितारे' या शोच्या 'ओ रे मनवा तू तो बावरा है तू ही जाने तू क्या सोचता है' हे गाणं अमृता यांनी सादर केलं होतं. या गाण्याचा व्हिडिओत त्यांनी शुभेच्छा देताना पोस्ट केली आहे.

हेही वाचा : 'या' आरोपाखाली गृहमंत्री अमित शाह गेले होते तुरुंगात, पवारांनी जाहीर सभेत लगावला होता टोला

ABOUT THE AUTHOR

...view details