मुंबई- राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा झाला तरी महायुतीत सरकार स्थापनेवरुन खल सुरू आहे. राज्यातल्या इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही राजकारण्यांच्या या भूमिकेला कंटाळल्या आहेत. "सरकार लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे. राजकारण्यांना आपण कुठे आहेत हे पाहून निर्णय घेण्याची सदबुद्धी आली पाहिजे," असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्या गोरेगाव इथल्या हॉटेलच्या उदघाटनासाठी आल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना हे मत व्यक्त केले.
राजकारण्यांना सदबुद्धी येऊन लवकर सरकार स्थापन व्हावे- अमृता फडणवीस - अमृता फडणवीस वादग्रस्त विधान बातमी
"सरकार लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे. राजकारण्यांना आपण कुठे आहेत हे पाहून निर्णय घेण्याची सद्बुद्धी आली पाहिजे," असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
अमृता फडणवीस
हेही वाचा-देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक
लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन व्हावे अशी जनतेची इच्छा आहे. त्यासाठी राजकारण्यांना उद्देशून बोलताना फडणवीस यांना कदाचित विसर पडला की आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपत्नी आहोत. राजकारण्यांवर सरसकट नाराजी व्यक्त करताना त्यांनी आपले पती मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सदबुद्धी यावी अशीच प्रार्थना केली की काय? अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.