मुंबई - राज्यामध्ये अनाकलनीय राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली.
हे सरकार विकास अ्न कल्याणासाठी निरंतर काम करेल; अमित शाह यांच्या फडणवीसांना शुभेच्छा - DevendraFadnavis
अमित शहा यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित शाह
अमित शाह यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'मला विश्वास आहे की, हे सरकार विकास आणि कल्याणासाठी काम करेल आणि महाराष्ट्रात विकासाचा नवा आयाम तयार होईल, असे त्यांनी ट्वीट केले आहे.