महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे पु़ढचे मुख्यमंत्री; अमित शाहांकडून शिक्कामोर्तब

युतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यात मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. असे असताना आज अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले आहे.

अमित शहा

By

Published : Sep 22, 2019, 3:12 PM IST

Updated : Sep 22, 2019, 3:19 PM IST

मुंबई- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भी तिढा अद्याप कायम आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकलानंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य करत अमित शाह यांनी फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब केले आहे.

युतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. त्यात मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. असे असताना आज अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट केले आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला न दुखावता महाराष्ट्रात एनडीएच सरकार असेल, असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले. मात्र आज युतीच्या घोषणेबाबत अमित शहा यांनी मातोश्रीवर जाणे टाळले. त्यामुळे अजून काही दिवस युतीच्या घोषणेची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येते.

हेही वाचा-कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा - गृहमंत्री अमित शाह

Last Updated : Sep 22, 2019, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details