महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिजाऊंच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल - अजित पवार - mumbai jijau news

जिजाऊच्या स्वाभिमानी विचारांवरच आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. अशा शब्दात राजमाता जिजाऊंचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंती निमित्त अभिवादन केले आहे.

अजित पवार राजमाता जिजाऊंना अभिवादन
अजित पवार राजमाता जिजाऊंना अभिवादन

By

Published : Jan 12, 2021, 4:27 PM IST

मुंबई - राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंच्या महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचे बळ दिले. जिजाऊच्या स्वाभिमानी विचारांवरच आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. अशा शब्दात राजमाता जिजाऊंचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जयंती निमित्त अभिवादन केले आहे.

अजित पवार यांचे अभिवादन
राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त वंदन करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकडो वर्षांच्या गुलमागिरीच्या जोखडातून मुक्ततेची वाट जिजाऊंनी महाराष्ट्राला दाखविली. त्यांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे-रयतेचे स्वराज्य स्थापन केले. मासाहेबांच्या ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. जिजाऊंचे विचार, संस्कार आपल्याला कायमच लढण्याची प्रेरणा आणि बळ देत राहतील. जिजाऊंनी मोठ्या शौर्याने, ध्यैर्याने, संयमाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात आपला महाराष्ट्र आज आघाडीवर दिसतो, याचे मूळ जिजाऊंनी रुजविलेल्या स्वाभिमानाच्या विचारात आणि राष्ट्रासाठी त्यागाच्या संस्कारात आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -मुरैना जिल्ह्यात विषारी दारू पिऊन आठ जणांचा मृत्यू मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details