महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या कर्जमाफीने लोकांची पिवळी होण्याची वेळ आली होती - अजित पवार - महात्मा फुले कर्जमुक्ती योजना

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिलपर्यंत पूर्णत्वाला नेण्याचा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारची कर्जमाफी तीन वर्ष चालली होती. 34 महिन्यातील भाजपच्या कर्जमाफीचा कोणाला फायदा झाला ते सांगा? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

mumbai
भाजपच्या कर्जमाफीने लोकांची पिवळी होण्याची वेळ आली होती - अजित पवार

By

Published : Mar 13, 2020, 2:50 PM IST

मुंबई - महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेला 22 हजार कोटी लागणार आहेत. भाजपच्या कर्जमाफीमध्ये नियम आणि अटींसह पिवळी, हिरवी आणि लाल यादी केली होती. या यामुळे लोकांची पिवळी होण्याची वेळ आली होती, असं लोकांना वाटायचं. आम्ही एकच शासन निर्णय काढला. त्यावरच आतापर्यंत कर्जमाफी करतोय 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण कर्जमाफी पूर्णत्वाला नेऊ, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी)अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.

आत्तापर्यंत 17 लाख 80 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी खात्यात 11 हजार 340 कोटी रुपये जमा केले आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिलपर्यंत पूर्णत्वाला नेण्याचा विश्वास अर्मंथत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारची कर्जमाफी तीन वर्ष चालली होती. 34 महिन्यातील भाजपच्या कर्जमाफीचा कोणाला फायदा झाला ते सांगा? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

कर्जमाफीत कुठल्या विभागाला काय मिळालं

  • कर्जमाफीत विदर्भातील 3 लाख 23 हजार 632 शेतकऱ्यांना 2575 कोटी रुपये
  • खानदेशातील 3 लाख 8700 शेतकऱ्यांना 2375 कोटी रुपये
  • मराठवाड्यातील 6 लाख शेतकऱ्यांना 6000 कोटी रुपयांची कर्जमाफी
  • पश्चिम महाराष्ट्रातील 3 लाख 43 हजार शेतकऱ्यांना 2400 कोटी रुपये

अजित पवारांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • हा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा अर्थसंकल्प नाही?
  • एखादी चुकीची बाब 50 वेळा ठासून सांगितली तर ती खरी वाटू लागते
  • हे महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही भागावर अन्याय करणार नसून राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी आहे
  • 2019-20 या नियुक्त केलेल्या 43 फेलोशिप अतंर्गत काम पूर्ण करण्याची संधी आम्ही देणार
  • मुख्यमंत्री फेलोशिपमधील मुलांना काढण्याकरता आम्ही सत्तेत आलेलो नाही, त्यांचं भलं करण्याकरता सत्तेत आलोय
  • 1600 एसटी बसेस, नव्या 500 अँब्यूलन्स खरेदी केल्या जाणार, त्या विदर्भ, मराठवाड्यासाठीही देण्यात येणार
  • 187 आरोग्य खात्यांची रुग्णालय पूर्ण करण्याकरता तीन वर्षात निधी देण्याचा निर्णय
  • डायलिसिस, ग्रामीण, शहर सडक योजनेची संपूर्ण राज्यात कामे केली जाणार
  • शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कोकणावर अन्याय कसा होईल
  • कोकणला वेगळा निधी दिला पाहिजे ही आमची भूमिका
  • कोकणातील चार मोठे पूल, रेवस ते रेड्डी मार्गासाठी 3500 कोटी रुपये
  • काजू प्रक्रियेसाठी 15 कोटी देणार, जर हा निधी कमी पडला तर आणखी निधी देणार. निधी कमी पडू देणार नाही
  • अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
  • कोकणातील अनेक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी दिला
  • वरळीला निधी दिला याचं काय वाटतंय, वरळी मुंबईत नाही का- तुम्ही बीकेसीतील हजार कोटी रुपयांची जमीन बुलेट ट्रेनला द्यायचं ठरवलं होतं

ABOUT THE AUTHOR

...view details