मुंबई - मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आढावा घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
'अमरावती विभागात कोरोनाची परिस्थिती गंभीर; लॉकडाऊनसंदर्भात बैठकीत निर्णय घेऊ' - ajit pawar reaction on corona patients
आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या संदर्भात आढावा घेण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. शहरांमध्ये परिस्थिती बिकट होत चालली असून संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळत आहेत.
कोरोनासंदर्भात बैठकीत निर्णय होणार
शहरांमध्ये परिस्थीती बिकट होत चालली असून संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आढळत आहेत. यासंबंधी आज दुपारी बैठक आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊनसाठी तीन शहरांपुरता निर्णय घ्यायचा की इतर ग्रामीण भागापुरता निर्णय घ्यायचा यासंबंधी निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -कोरोनाची दुसरी लाट? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू