मुंबई - राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पवारांसह इतर नेत्यांकडून जामीन घेण्यासाठी धावपळ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रा मध्येच सोडून पवार हे मंगळवारी मुंबईत पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सहकारी बँक घोटाळा.. शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत दाखल - shivsena
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, ज्या राज्य शिखर बँक प्रकरणी यापूर्वी तीन वेळा याची विभागीय चौकशी केली होती. परंतु त्यात काहीच निष्पन्न झालेले नाही. आताही सरकारने न्यायालयात नीट भूमिका मांडली नाही. ज्यांनी हे प्रकरण पुन्हा आणले त्या याचिकाकर्त्यांची पार्श्वभूमीही तपासली पाहिजे.
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यभरात याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी शिवस्वराज्य यात्रा सोडून आपल्या खाजगी कामासाठी पुण्याला आले आहेत. मंगळवारी त्यांच्याकडून जामीनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याविषयी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांकडून खुलासा करण्यात आला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, ज्या राज्य शिखर बँक प्रकरणी यापूर्वी तीन वेळा याची विभागीय चौकशी केली होती. परंतु त्यात काहीच निष्पन्न झालेले नाही. आताही सरकारने न्यायालयात नीट भूमिका मांडली नाही. ज्यांनी हे प्रकरण पुन्हा आणले त्या याचिकाकर्त्यांची पार्श्वभूमीही तपासली पाहिजे. अरोरा हे भाजप नेत्यांच्या जवळचे आणि राजकीय व्यक्ती आहेत. जे वकील आता ही केस लढत आहेत त्यांच्या घरातील लोक हे भाजपचे आहेत. तर याचिकाकर्ते हे भाजपचे आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांच्या घरी जाऊन जेवण करत असतात. यामुळे हा सर्व प्रकार केवळ राजकीय हेतूने प्रेरीत आहे. तशी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. या शिखर बँकेमध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, शेकाप, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सभसद होते. याची अनेकदा चौकशी झाली. त्यामुळे आणखी चौकशी होऊ द्या, आमची हरकत नाही. पण हे सर्व राजकीय हेतूने घडत आहे त्याची मला आता खात्री पटली आहे. असेही नवाब मलिक यांनी सांगितले.