महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर 'मुंबईच्या डबेवाल्यां'च्या घरांचा प्रश्न मार्गी; 'डबेवाला भवन'ही राहणार उभे

येत्या काही दिवसात आम्ही आपल्याला भूखंडाची यादी देऊ व आपणास योग्य वाटेल त्या भूखंडाची निवड करता येईल. आपल्या घरांचा प्रश्न सुटेल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरात लवकर मुंबईत डबेवाला भवन उभे राहिल, असे आश्वासन अजित पवार यांनी डबेवाल्यांना दिले.

ajit-pawar-has-ordered-concerned-departments-and-officers-to-make-available-homes-for-the-mumbai-dabbawalas
ajit-pawar-has-ordered-concerned-departments-and-officers-to-make-available-homes-for-the-mumbai-dabbawalas

By

Published : Feb 13, 2020, 9:10 PM IST

Updated : Feb 13, 2020, 10:20 PM IST

मुंबई- मुंबापुरीची ओळख असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या डबेवाल्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच तसेच 'डबेवाला भवन' या संदर्भातही यावेळी चर्चा झाली.

हेही वाचा-चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड, तर मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढांवर कायम

या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव व इतर अधिकारी, मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे तसेच उपाध्यक्ष सबाजी मेदगे यांच्यासह डबेवाल्यांच शिष्टमंडळ उपस्थित होते.

डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न तसेच डबेवाला भवना संदर्भात यावेळी विषय मांडण्यात आले. यावर अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ताबडतोब डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.

येत्या काही दिवसात आम्ही आपल्याला भूखंडाची यादी देऊ व आपणास योग्य वाटेल त्या भूखंडाची निवड करता येईल. आपल्या घरांचा प्रश्न सुटेल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरात लवकर मुंबईत डबेवाला भवन उभे राहिल असे आश्वासन अजित पवार यांनी डबेवाल्यांना दिले.

Last Updated : Feb 13, 2020, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details