मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे एक मोठा भूकंप आला.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि 8 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी सुनील तटकरे तर महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक पार पडली. बैठकीनंतर महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आपल्यासोबत काही आमदार घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले.
संघटनात्मक बैठकांचे सत्र : अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी संघटनात्मक बैठकांचे सत्र सुरु आहे. एका बाजूला पक्षातील मंत्र्यांना कोणती खाती दिली जावीत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी देवगिरी निवास्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आहेत.
NCP Political Crisis: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तपत्रे बहाल - Ajit Pawar
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर पक्षात अनेक बदल घडून आले. मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तपत्रे बहाल करण्यात आली आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
महिला संघटनेच्या महिलांची नियुक्ती पत्र : महिला कार्यकारणी बैठकीला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्य महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या महिलांची नियुक्ती पत्र देण्यात आली. राष्ट्रवादीच्या आमदारांना सामावून घेतल्यानंतर सध्याच्या घडीला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २९ मंत्री आहेत.
हेही वाचा :