महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार-देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री द्वयांच्या वाढदिवसाचा सोहळा झालाच नाही... - अजितदादांच्या वाढदिवसाचे निमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या समर्थक आमदारांसह दिल्लीश्वराना आनंदाचे भरते आले. मात्र हा आनंद साजरा करण्यासाठी योग्य अवचित्य मिळत नव्हते. अखेरीस अजितदादांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गुरुवारी आखलेला आनंद सोहळा अखेर झालाच नाही. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेचे सावट या सोहळ्यावर पडले आणि हाही आनंद हिरावला गेला.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 20, 2023, 8:53 PM IST

Updated : Jul 20, 2023, 9:58 PM IST

मुंबई - राज्यातल्या जाणत्या नेतृत्वाची सावली मानल्या जाणाऱ्या धाकल्या पवारांनी काकांची साथ सोडली आणि अडीच वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाची पुनरावृत्ती केली. यावेळी मात्र त्यांनी प्रयोग एकदाच फसतो सारखा नाही हे दाखवून देत स्वतःसह थेट आणखी आपल्या आठ शिलेदारांचीही मंत्रीपदी वर्णी लावली.


दिल्लीश्वरांनाही आनंदाचे भरते -पवारांच्या या धाडसाचे त्यांच्या समर्थक आमदार आणि चाहत्यांकडून जोरदार कौतुक सुरू झाले. मात्र या कौतुकाचा उघड सोहळा करण्याची संधी अजित पवार यांच्या चाहत्यांना मिळत नव्हती. पवारांच्या या धाडसाने केवळ त्यांच्या चाहत्यांच्या मनातच आनंदाच्या उकळ्या कुठल्या असे नाही तर थेट दिल्लीश्वरांनाही आनंदाचे भरते आले. त्याचे कारणही तसेच होते थेट शरद पवारांना आव्हान देत अजित पवारांनी सावतासुभा थाटला. अजूनही अजित पवारांच्या या कृतीमागे शरद पवारांचा हात असावा असे कित्येकांना वाटत असल्याने एवढ्या मोठ्या धाडसाचे पूर्ण श्रेयही अजित पवारांना घेता येईना.


कसा करावा सोहळा - अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या खाक्याप्रमाणे प्रशासनावर आणि मंत्रिमंडळावरही वचक दाखवायला सुरुवात केली. शिंदे घाटाचा विरोध असतानाही पवारांनी अर्थ खाते सोडले नाही. त्याचबरोबर आपल्या शिलेदारांच्या पदरात महत्त्वाची खाती पाडून घेण्यातही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे एकूणच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अजित पवार गटामध्ये होते. मात्र हा आनंद साजरा करण्याची संधी मिळत नव्हती. अखेरीस अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात अजित उत्सव साजरा करण्याचा आणि गुरुवारी नव्या युतीतल्या सर्व बड्या नेत्यांना स्नेहभोजन देण्याचा बेत आखण्यात आला. मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा कार्यक्रम करण्याचे योजिले.

दुर्घटनेमुळे कार्यक्रम रद्द -मात्र दैवाच्या आणि नियतीच्या मनात मात्र हा सोहळा व्हावा असे बहुदा नसावे. बुधवारी रात्री रायगड येथील खालापूर जवळ इर्शाळवाडी दरड कोसळण्याच्या घडलेल्या घटनेने अजित पवार गटाच्या आनंदावर पुन्हा एकदा विरजण पडले. प्रथमच शिंदे गटातील आमदार नेते आणि भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील सर्व नेते या स्नेहभोजनासाठी एकत्र येणार होते. त्यामुळे जवळपास हा सर्वपक्षीय मेळावाच ठरणार होता. परंतु घडलेल्या दुर्घटनेमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने स्नेह मिलनाची चालून आलेली संधी पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून हिरावली गेली आहे.

Last Updated : Jul 20, 2023, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details