परभणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला ७ हजार रु. भाव मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांचा कार्यकाळ संपत आला तरी अद्याप शेतमालाला भाव नाही. कधी मिळणार भाव? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत हे सरकार आणखी मोठ गाजर दाकवणार असल्याचे पवार म्हणाले.
सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी शेतमालाला भाव नाही, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - शेतमालाला भाव नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ संपत आला तरी अद्याप शेतमालाला भाव नाही. कधी मिळणार भाव? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या 'कृषी उत्पन्न बाजार समिती' इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन समारंभाला अजित पवार यांच्या हस्ते झाला. यानंतर आयोजीत सभेत पवार बोलत होते. भाजप सरकारचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपत आला तरी अद्याप कापूस, तूरडाळ यांसह अन्य शेतमालाला अजून योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतमालाला योग्य भाव देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले नसल्याचे पवार म्हणाले.
पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांसाठी उत्पन्नाचे मार्ग मोकळे केले. महिला बचत गट सुरु केले. महिला प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करत असल्याचे, पवार म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला असल्याचे पवार म्हणाले.