मुंबई - दिवंगत व्यक्तींचा आदर केलाच पाहिजे. सावरकर यांच्याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित करून गैरसमज तयार करू नये. त्यांच्याबाबत सभागृहात प्रस्ताव आला तर विरोध करण्याचा प्रश्न नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सावरकरांच्या प्रस्तावाबाबत अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील, असेही पवार म्हणाले.
सावरकरांच्या प्रस्तावाबाबत अध्यक्ष योग्य निर्णय घेतील - अजित पवार - Ajit pawar newss
सावरकर यांच्याबाबत नव्याने प्रश्न तयार करून गैरसमज तयार करू नये, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यांच्याबाबत सभागृहात प्रस्ताव आला तर विरोध करण्याचा प्रश्न नसल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार
विनायक दामोदर सावरकर यांच्या मुद्यावरुन भाजप सत्तेत असलेल्या शिवेसनेसमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रय्तन करत आहे. आज (२६ फेब्रुवारी) सावरकरांची पुण्यतिथी आहे. भाजप सभागृहात त्यांचा स्वागत प्रस्ताव मांडणार आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. विरोधकांना काय करायचे ते त्यांनी करावे. आम्हाला सभागृह चालवायचे असल्याचे पवार म्हणाले. तसेच सभागृहाची संमती असेल तर प्रस्ताव चर्चेला घेता येऊ शकेल, असेही अजित पवार म्हणाले.