मुंबई - कोणी पक्ष सोडल्याने पक्ष संपत नसतो. पक्ष सोडल्याने वजाबाकीच होते असे नाही तर काही वेळेस बेरीजसुद्धा होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाचा पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचे पवार म्हणाले.
कोणी पक्षांतर केल्याने पक्ष संपत नसतो, अहिरांच्या सेना प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया - मातोश्री
कोणी पक्ष सोडल्याने पक्ष संपत नसतो. पक्ष सोडल्याने वजाबाकीच होते असे नाही तर काही वेळेस बेरीजसुद्धा होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाचा पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचेही पवार म्हणाले.
अहिरांच्या सेना प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी ५ आमदारांपासून ६५ आमदार पुन्हा निवडून आणले होते. त्यामुळे कोणीही पक्ष सोडल्याने पक्ष संपत नसतो. आता लोकांचा पक्षावर असलेला विश्वास वाढेल असेही अजित पवार म्हणाले.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल (गुरुवार) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सचिन अहिर यांच्यावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.