मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बोललो तर सुप्रीम कोर्टातील केसवर परिणाम होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सोमवारपर्यंत तोडगा काढणार असल्याची माहितीही अजित पवारांनी विधानसभेत दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात आत्ता बोललो तर अडचणी निर्माण होतील - अजित पवार - आझाद मैदानावर मराठा आंदोलन
आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आझाद मैदानावर सुरू आंदोलनाचा प्रश्न उपस्थित केला होता. महिनाभर मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. हा मुद्दा संवेदनशील आहे. अजित दादा ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसे त्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला आणि पहाटे शपथ घेतली तेही ऑन द स्पॉट असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार
आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आझाद मैदानावर सुरू आंदोलनाचा प्रश्न उपस्थित केला होता. महिनाभर मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. हा मुद्दा संवेदनशील आहे. अजित दादा ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसे त्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला आणि पहाटे शपथ घेतली तेही ऑन द स्पॉट असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्या प्रमाणेच हा निर्णय घ्या, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना टोला लगावला.