महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यसनांपासून, अमली पदार्थांपासून दूर रहा; अजित पवार यांचे तरुणांना आवाहन

व्यसनांपासून, अमली पदार्थांपासून दूर रहा तरुणांनी दूर राहिले पाहिजे. दररोज व्यायाम करा, निरोगी व तंदुरुस्त आयुष्य जगा असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. व्यसनापासून मुक्त होता येते, त्यासाठी वेळीच तज्ज्ञांची मदत घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ajit pawar
अजित पवार

By

Published : Jun 26, 2020, 3:49 PM IST

मुंबई -जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील युवा पिढिला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. निरोगी, तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमली पदार्थांचे सेवन हा मानसिक आजार आहे. त्याचे दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर, समाजावर होत असतात, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. एखाद्याला व्यसन असले तरी कुठल्याही व्यसनांपासून मुक्त होता येते. त्यासाठी वेळीच तज्ज्ञांची मदत घ्या. त्यांनी सुचवलेले उपचार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपली तरुण पिढी हीच देशाची संपत्ती, भविष्य आहे. हे भविष्य उज्वल करण्यासाठी युवा पिढी व्यसनमुक्त, अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. मानवी आयुष्य सुंदर आहे. ते सुंदर ठेवण्यासाठी अमली पदार्थांपासून, व्यसनांपासून सर्वांनी दूर रहा. आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. दररोज व्यायाम करा. निरोगी रहा, तंदुरुस्त रहा,असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details