मुंबई:एअर इंडियाने नेहमीच प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. कोरुसन सोबतचा हा करार त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. आइडियाजेन सॉफ्टवेअर जोखमीच्या सर्व पैलूंचा समावेश करते. ज्यामुळे विमानाच्या देखभालीपासून ते केबिन क्रू तपासण्यापर्यंतच्या सुरक्षिततेच्या डेटाची एअरलाइनला संपूर्ण माहिती मिळणार आहे. एअर इंडियाला एअरलाइनच्या संपूर्ण संस्थेमध्ये नवीन डेटामध्ये प्रवेश करण्याची आणि संभाव्य जोखीम शोधण्यासाठी तसेच कमी करण्यासाठी याचा वापर होणार आहे. ज्यामुळे ऑपरेशन्सची सुरक्षितता वाढेल असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी:याबाबत बोलताना, एअर इंडियाचे सुरक्षा, सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाचे प्रमुख हेन्री डोनोहो यांनी म्हणले आहे की, आम्ही आमच्या विद्यमान प्रणाली आणि प्रक्रियांमध्ये लक्षणीय आणि भरीव सुधारणा करणार आहोत, ज्यामुळे रीअल टाइम आधारावर बुद्धिमत्ता आणि डेटाचा अखंड प्रवाह सुनिश्चित होईल. जोखीम कमी करण्यासाठी, ऑडिटिंग आणि प्रशिक्षणासाठी जागतिक स्तरावर कोरुसनवर विमानचालन उद्योगाने विश्वास ठेवला आहे. त्याचा समावेश आमच्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी तसेच आमच्या क्षमता वाढवण्यास खूप मदत करेल. असे