महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केरळ विमान दुर्घटना : मराठमोळे वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू - chief pilot dipak sathe died

वंदे भारत मोहिमेंतर्गत दुबईहून केरळच्या कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचे AXB-1344 हे विमान धावपट्टीवर उतरत असताना हा भीषण अपघात झाला. विमानात एकूण 184 प्रवासी होते.

chief pilot dipak sathe
वैमानिक दीपक साठे

By

Published : Aug 8, 2020, 10:44 AM IST

Updated : Aug 8, 2020, 11:47 AM IST

मुंबई -केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर धावपट्टीवरून विमान घसरून अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून 42 मिनिटांच्या सुमारास झालेला हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचे दरीत पडून दोन तुकडे झाले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्य वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

केरळ विमान अपघात : मराठमोळे वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू

वंदे भारत मोहिमेंतर्गत दुबईहून केरळच्या कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचे AXB-1344 हे विमान धावपट्टीवर उतरत असताना हा भीषण अपघात झाला. विमानात एकूण 184 प्रवासी होते.

साठे हे मुंबईतील पवई येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असे परिवार आहे. त्यांची पत्नी केरळ येथे पोहोचली आहे. साठे यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार की केरळ मध्ये याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.

हवाईदल अधिकारी राहिलेले कॅप्टन दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. तसेच सुमारे १५ वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये वैमानिक होते. साठे हे 1981 साली हवाईदलात वैमानिक म्हणून रुजू झाले. त्याआधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले.

सुरुवातीला अनेक वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे ‘एअरबस 310’ हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोइंग विमानावर स्थलांतरित झाले होते. केरळमधील अपघात हा बोइंग 737 विमानाचाच होता. दीपक साठे हे हवाईदल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर राहिले होते. राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची मानाची तलवार त्यावेळी त्यांनी जिंकली होती. 22 वर्षांच्या हवाईदलातील सेवेत ते हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) चाचणी वैमानिक अर्थात टेस्ट पायलटदेखील राहिले होते. त्यांच्यामागे पत्नी सुषमा, शंतनू आणि धनंजय यांच्यासह सुना, असा मोठा आप्त परिवार आहे. दोन्ही मुले सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे.

Last Updated : Aug 8, 2020, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details