मुंबई -आम्ही नवरदेव आहोत. ज्या नवरीशी लग्न कर म्हणून सांगणार तिच्याशीच लग्न करणार असल्याचे वक्तव्य शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सरकार बनवणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
'आम्ही नवरदेव असून ज्या नवरीशी लग्न कर म्हणेल त्याच नवरीशी करणार' - महाराष्ट्र सत्तास्थापन
आमदार गुलाबराव पाटील म्हणाले, आम्हाला विकत घेण्याची कोणाची हिम्मत नाही. मातोश्रीवरून आलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्हाला लपवून ठेवलेले नाही. येथे मोकळ्या हवेत आम्ही आहोत. कोणीही आम्हाला विकत घेऊच शकत नाही.
राज्यात अद्यापही सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. भाजप आणि सेना अद्यापही सत्तेचा सारीपाट खेळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी वाद सुरू आहेत. भाजपकडून आमदार फोडले जातील या भीतीने शिवसेनेच्या सर्वच आमदारांना रंगशारदामध्ये ठेवण्यात आले. यावेळी आमदार गुलाबराव पाटील म्हणाले, आम्हाला विकत घेण्याची कोणाची हिम्मत नाही. मातोश्रीवरून आलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्हाला लपवून ठेवलेले नाही आहे. येथे मोकळ्या हवेत आम्ही आहोत. कोणीही आम्हाला विकत घेऊच शकत नाही.
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि समान खातेवाटप आमचा हक्क आहे. दिलेला शब्द भाजपने पाळावा, असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.