महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचे वेतन रखडलेले आहे. कंपनी कार्यरत नसताना देखील कामगार कामावर येतात, परंतु त्यांना वेतन मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

By

Published : May 3, 2019, 3:10 PM IST

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

मुंबई - आर्थिक मंदीमुळे जेट एअरवेज ही कंपनी डबघाईला येऊन बंद पडली आहे. या कंपनीत काम करणारे २० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकाने मदत करावी या मागणीसाठी कामगार हे आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. मंत्रालयात जाऊन आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे, जेट एअरवेजच्या कर्मचाऱयांनी सांगितले.

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचे वेतन रखडलेले आहे. कंपनी कार्यरत नसताना देखील कामगार कामावर येतात, परंतु त्यांना वेतन मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कंपनीकडे लक्ष द्यालावे व या कंपनीला मदत करावी यासाठी कामगार आझाद मैदानात आले आहेत व आपला रोष व्यक्त करत आहेत.

जेट एअरवेज कंपनी २०१० पासून आर्थिक संकटात सापडली आहे. नरेश गोयल यांनी सुरू केलेल्या जेट एअरवेज कंपनीने अडीच दशके विमानसेवा दिली. रोज १२३ विमान उडविणारी ही कंपनी काही या महिन्यापासून फक्त पाचच विमान उडवत होती. कंपनीतील कामगारांचेही पगार काही महिन्यापासून रखडलेले आहेत. अखेर काही दिवसापूर्वीच ही कंपनी बंद पडली, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे या कंपनीत अनेक वर्षापासून काम करणारे कामगार संतप्त झालेले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे ही कंपनी सरकारने किंवा इतर कंपनीने आपल्या ताब्यात घ्यावी व याची सेवा पुन्हा सुरू करावी यासाठी सरकारकडे मागणी करण्यासाठी सर्व कामगार आजाद मैदान येथे आंदोलनासाठी आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details