मुंबई- नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या जातीयवादी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. पायलला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या संघटना यांनी नायर रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने केली. तसेच घटनेला जबाबदार असलेल्या तीनही वरिष्ठ डॉक्टरांना लवकर अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. पायलच्या मारेकऱ्यांना अटक करा; डाव्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांची निदर्शने - जातीयवादी
डॉ. पायल तडवी हिने तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या जातीयवादी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.
डॉ. पायल हिला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी, एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी नायर रुग्णालयाच्याबाहेर निदर्शने केली. डॉ. तडवी हिच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करा, अशी मागणी करत नायर रुग्णालयाचा परिसर दणाणून सोडला.
एका हुशार विद्यार्थिनीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. पायलचा मानसिक छळ करणाऱ्या या तीनही डॉक्टरांना अटक केली पाहिजे. त्यांचे मेडिकल मान्यता रद्द केली पाहिजे, असे सीपीएमचे कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.