मुंबई - पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे आर्थिक व्यवहार, व्यापार आयात-निर्यात बंद करावी. झोपडीधारकांना मूलभूत सुविधा पाणी वीज देण्यात आल्या पाहिजेत. यासोबतच दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यावे. अशा विविध मागण्यांसाठी आज भीम आर्मीने मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करत आंदोलन केले.
विविध मागण्यांसाठी मुंबईत भीम आर्मीचे आंदोलन - Agitation
विविध मागण्यांसाठी आज भीम आर्मीने मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करत आंदोलन केले
पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता पोळ, वनिता अडसुळे यांना पोलिसांनी ३५३ कलमानुसार सूडबुद्धीने अटक केली आहे, असा आरोप भीम आर्मीने यावेळी केला. आज महिना झाला तरी अजूनही त्यांना बेल मिळाली नाही असेही आंदोलनकर्ते म्हणाले.
चेंबूरमध्ये बिल्डर स्थानिक लोकांची गळचेपी करत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे अनेक प्रश्न घेऊन आज भीम आर्मीने आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे भीम आर्मीचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड यांनी सांगितले.