महाराष्ट्र

maharashtra

आज...आत्ता...दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...

By

Published : May 25, 2019, 2:01 PM IST

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी दिला आहे, तर दुसरीकडे शरद पवार कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाहीतर खासदार नारायण राणे यांनी पुत्राच्या पराभवानंतर ईव्हीएममध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. शिवाय मध्यप्रदेशात गोरक्षकांनी २ युवकांसह महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आलेला आहे, तर तुमच्या व्हॉट्सअॅप 'स्टेट्स'मधून फेसबुक पैसे मिळवणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर पराजयाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यसमितीची (CWC) बैठक सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान पक्षाध्यक्षांनी पराजयाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. मात्र, पक्षानी त्यांचा राजीनामा अमान्य केला आहे. वाचा सविस्तर...

...जिकंलो नसलो तरी, अजून मी हरलो नाही - शरद पवार

मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-सेना युतील घवघवीत यश मिळाले तर आघाडीतील काँग्रेसचा मानहाणीकारक पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित यश मिळाले नाही. शिवाय पार्थ पवारांच्या रुपाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पाहावे लागले. या सर्व घडामोडीमध्ये शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, त्यांच्या प्रंचड आशेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. दरम्यान, या निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो, तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर...

पुत्राच्या पराभवानंतर खासदार नारायण राणेंकडून 'ईव्हीएम'मध्ये हेराफेरीचा संशय!

सिंधुदुर्ग - ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे आरोप विरोधकांकडून अनेकदा झालेले आहेत. मात्र, मुलाच्या पराभवानंतर चक्क भाजप खासदार नारायण राणेंनीच निकालात हेराफेर झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाचा सविस्तर...

गोरक्षकांची गुंडगिरी, बघा २ युवकांसह महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ

सिवनी - मध्यप्रदेशमधील सीवनी येथील गोरक्षकांच्या गुंडगिरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गोरक्षकांनी दोन युवकांसह एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. त्या युवकांनी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे. तसेच त्यांना जय श्रीरामच्या घोषणाही द्यायला लावल्या. वाचा सविस्तर...

तुमच्या व्हॉट्सअॅप 'स्टेट्स'मधून फेसबुक मिळविणार पैसे

सॅन फ्रान्सिस्को - तुम्ही जे व्हॉट्सअॅप स्टेट्स टाकता त्यातून फेसबुकला पैसे मिळणार आहेत. याबाबतची माहिती व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या फेसबुकनेच दिली आहे. या व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सवरील जाहिराती पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी...

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details