महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता....दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - afternoon bulletin

डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या ५ जूनला भारताचा व्यापार प्राधान्यक्रम दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याला केंद्रीय मंत्री दानवे यांनी बगल दिली आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांची चौथ्यांदा काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये ६०-७० च्या दशकात आपल्या अभिनयाला वेगळ्या उंचीवर पोहोचवणाऱ्या नर्गिस यांचा आज वाढदिवस आहे. शिवाय गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आज विश्वकरंडक स्पर्धेमध्ये ब्रिस्टॉलच्या काऊंटी मैदानावर पहिला सामना खेळणार आहे.

महत्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 1, 2019, 2:02 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचा 'दे धक्का' ; ५ जूनला भारताचा काढून घेणार व्यापार प्राधान्यक्रम दर्जा

वॉशिंग्टन- एनडीए पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकारसमोरील विविध आर्थिक आव्हाने समोर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा व्यापार प्राधान्यक्रम दर्जा (प्रेफन्शियल ट्रेड स्टेट्स) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा दर्जा ५ जूननंतर काढून घेणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. या दर्जामुळे विकसित होणारा देश म्हणून भारताला अमेरिकेबरोबरील व्यापारात सवलती मिळत होत्या.वाचा सविस्तर...

भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण? या प्रश्नाला केंद्रीय मंत्री दानवेंची बगल; म्हणाले...

शिर्डी- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, शपथविधी उरकल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शिर्डी विमानतळावरून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी नवीन प्रदेशाध्यक्षपदी कोण या प्रश्नाला दानवेंनी बगल दिल्याचे पाहायला मिळाले.वाचा सविस्तर...

सोनिया गांधी यांची चौथ्यांदा काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड

नवी दिल्ली- सोनिया गांधी यांची चौथ्यांदा काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. वाचा सविस्तर...

B'day Spl: यामुळे नर्गिस अन् राजकपूरचे तुटले नाते, सुनील दत्त यांनी जीवाची बाजी लावून वाचवले होते प्राण

मुंबई- बॉलिवूडमध्ये ६०-७० च्या दशकात आपल्या अभिनयाला वेगळ्या उंचीवर पोहोचवणाऱ्या नर्गिस यांचा आज वाढदिवस आहे. १ जून १९२९ साली त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या चित्रपट करिअरसोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील खूप चर्चेत राहिले. त्यांची आणि राज कपूर यांची प्रेमकथा, त्यांचे ब्रेकअप त्यानंतर सुनील दत्त यांच्याशी लग्न, या सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यात अनामिक, अशा वळणावर घडल्या होत्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...वाचा सविस्तर...

CRICKET WORLDCUP : पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया समोर अफगाणिस्तानचा सोपा पेपर

ब्रिस्टॉल - गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आज विश्वकरंडक स्पर्धेमध्ये ब्रिस्टॉलच्या काऊंटी मैदानावर पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर नवख्या अफगाणिस्तानचा सोपा पेपर असणार आहे. चेंडू फेरफार प्रकरणात अडकलेल्या स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रलियाचा संघ अधिक बळकट झाला आहे. आजचा सामना सायंकाळी ६ वाजता सुरु होईल. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी
https://preprod.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details