महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज... आत्ता... दुपारी २ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - emergency landing

भामरागडच्या जंगलात सी-60 जवान आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक; नक्षली साहित्य जप्त. शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी; निर्देशांकात ९४२ अंशाची उसळी, रुपया ७९ पैशांनी मजबूत. मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसची आराम बसला धडक; 2 ठार. चेन्नई विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लँडींग; कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी सुरक्षित. 'आ रहे है दोबारा', नितीन गडकरी आणि विवेकने लाँच केलं 'पीएम मोदी'चं नवं पोस्टर.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : May 20, 2019, 2:02 PM IST

भामरागडच्या जंगलात सी-60 जवान आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक; नक्षली साहित्य जप्त

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या कोपर्शी जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास सी -60 कमांडोचे विशेष अभियान सुरु असताना जवानांची नक्षवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नक्षवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर...

शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी; निर्देशांकात ९४२ अंशाची उसळी, रुपया ७९ पैशांनी मजबूत

मुंबई - लोकसभेच्या मतदान निकालाच्या अंदाजात (एक्झिट पोल) एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, अशी आकडेवारी समोर आली आहे. याचा परिणाम म्हणून शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९४२ अंशाने उसळला आहे. तर रुपया डॉलरच्या तुलनेत ७९ पैशांनी वधारला आहे. वाचा सविस्तर...

मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसची आराम बसला धडक; 2 ठार

रायगड - मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर हद्दीत मिनीबस व आराम बसचा अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले. तर 18 जण जखमी झाले आहेत. जोसेफ सेरेजो (62) व कांबळे असे अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमी प्रवाशांना खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

चेन्नई विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लँडींग; कर्मचाऱ्यांसह १६१ प्रवासी सुरक्षित

चेन्नई - सिंगापूर स्कूट एअरवेजचे टीआर 567 हे विमान आपत्कालीन परिस्थितीत चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानाने तमिळनाडूतील त्रीची या ठिकाणावरून उड्डाण केले होते. वाचा सविस्तर...

'आ रहे है दोबारा', नितीन गडकरी आणि विवेकने लाँच केलं 'पीएम मोदी'चं नवं पोस्टर

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' बायोपिक येत्या २४ मे'ला म्हणेजच लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अशात आता चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात या बायोपिकचे नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details