महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता... दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - fire

Loksabha Election Live : पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये वादावादी; गाड्यांची तोडफोड, अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त. धक्कादायक! लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवविवाहितेचे अपहरण करुन बलात्कार. गडचिरोलीत नक्षलवाद्यांच जळीतकांड; वनविभागाच्या लाकडांची जाळपोळ. बिहारमध्ये पेट्रोल टाकून मायलेकींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न. अमरवातीतील वलगाव पुनर्वसन वस्तीत सिलेंडरचा स्फोट, ५५ घरांची राखरांगोळी

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : May 19, 2019, 2:11 PM IST

Loksabha Election Live : पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये वादावादी; गाड्यांची तोडफोड, अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान सुरू झाले आहे. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९१८ उमेदवारांचे भाग्य १०.०१ लाख मतदार निश्चित करणार आहेत. वाचा सविस्तर...

धक्कादायक ! लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवविवाहितेचे अपहरण करुन बलात्कार

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यात लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आप्पा मधुकर माकोडे (२५, रा. डागपिंपळगाव) असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याच शोध घेत आहेत. वाचा सविस्तर...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच जळीतकांड; वनविभागाच्या लाकडांची जाळपोळ

गडचिरोली - आज नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हाबंदच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली-आलापल्ली मार्गावर झाडे तोडून नक्षलवाद्यांनी रस्ता बंद केला आहे. तर वनविभागाच्या लाकूड डेपोलाही आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नक्षल बंदमुळे दुर्गम भागातील बसफेऱ्या व इतर वाहतूक ठप्प झाली आहे. वाचा सविस्तर...

बिहारमध्ये पेट्रोल टाकून मायलेकींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पाटणा - विलायती चिंच तोडण्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्याच आजी आणि आत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बिहारच्या खरहट (ता. रानीगंज, जि. अररिया) गावात घडली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. वाचा सविस्तर...

अमरवातीतील वलगाव पुनर्वसन वस्तीत सिलेंडरचा स्फोट, ५५ घरांची राखरांगोळी

अमरावती - शहरालगत तिवसा विधानसभा मतदारसंघातील वलगाव पुनर्वसन लोक वस्तीतील दोन घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग पसरत वस्तीतील इतर घराला लागली. यात ६० घरांपैकी ५५ पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना आज रविवारी सकाळी १० वाजता घडली. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details