महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - 13 may

गडचिरोलीत नक्षलींचे थैमान सुरुच; तीन वाहनांची जाळपोळ, लाखोंचे नुकसान. मराठा आरक्षण: एसईबीसीच्या माध्यमातून प्रवेश नाकारण्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन. नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, गेल्या ४ महिन्यात २५ दुचाकीस्वारांनी गमावला जीव. शेअर बाजाराच्या निर्देशांकात पडझड सुरुच, रुपया डॉलरच्या तुलनेत पोहोचला ७०. १८ वर. रत्नागिरीचा हापूस आंबा सातासमुद्रापार; लंडन, अमेरिका आणि आता कॅनडानंतर दुबई वारी यशस्वी.

बुलेटिन

By

Published : May 13, 2019, 2:19 PM IST

गडचिरोलीत नक्षलींचे थैमान सुरुच; तीन वाहनांची जाळपोळ, लाखोंचे नुकसान

गडचिरोली - माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. वाहनांची जाळपोळ, भूसुरुंग स्फोट, पोलीस खबरी म्हणून सामान्य नागरिकांची हत्या असे सत्र सुरूच आहे. अशातच आता नक्षलवाद्यांनी आणखी तीन वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. वाचा सविस्तर...

मराठा आरक्षण: एसईबीसीच्या माध्यमातून प्रवेश नाकारण्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

मुंबई - मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक मोर्चे निघाल्यानंतर याबाबत राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ ला सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू केले. मात्र नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे मराठा समाजातील मेडिकल प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसईबीसीच्या माध्यमातून प्रवेश नाकारण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने एसईबीसीच्या माध्यमातून सुरू केलेले मेडिकल प्रवेश अचानक रद्द केल्याने राज्यातील हजारो मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. वाचा सविस्तर...

नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, गेल्या ४ महिन्यात २५ दुचाकीस्वारांनी गमावला जीव

नाशिक - शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी नाशिक पोलिसांनी आजपासून नाशिक शहर व परिसरात हेल्मेट सक्ती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेला विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून समर्थन मिळत आहे. वाचा सविस्तर...

शेअर बाजाराच्या निर्देशांकात पडझड सुरुच, रुपया डॉलरच्या तुलनेत पोहोचला ७०. १८ वर

मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्धाचा अजूनही शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक २३.९६ अंशाने घसरून ३७,४३९ वर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत २६ पैशांची घसरण होवून रुपया ७०. १८ वर स्थिरावला.वाचा सविस्तर...

रत्नागिरीचा हापूस आंबा सातासमुद्रापार; लंडन, अमेरिका आणि आता कॅनडानंतर दुबई वारी यशस्वी

मुंबई - जगप्रसिद्ध हापूस आंब्याची गोडी सातासमुद्रापार पोहोचली आहे. चांगला दर आणि चांगली गुणवत्ता यामुळे हापूस आंब्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रत्नागिरीच्या हापूस निर्यात सुविधा केंद्रातून ३० टन हापूस आंबा लंडन अमेरिका कॅनडा आणि दुबईला रवाना झाला आहे. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details