मुंबई : वसईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आरोपी आफताब पुनावाला अटकेत ( Shradha murder case ) आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत ( Aaftaf Poonawala )आहेत. आरोपीच्या चौकशीतुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात फेकले. यामागे त्याने अनेक कबुली जबाब दिले आहेत. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन वेळा आफताफ येऊन गेला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.
डेटिंग अॅपद्वारे ओळख :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांची मुंबईत नोकरीदरम्यान डेटिंग अॅपद्वारे मे २०१७मध्ये भेट झाली. पोलीस आता डेटिंग अॅप्सवरून आफताबच्या प्रोफाइलचीही तपासणी करत आहेत. जेव्हा श्रद्धाच्या शरीराचे अवयव त्याच्या घरात होते, तेव्हा त्याने इतर मुली किंवा महिलांसोबत घरात संबंध ठेवल्याचा खुलासाही पोलिसांनी केला आहे.
श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट : 18 मेला आफताफने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे इंटरनेटवर रात्रभर सर्च केले आणि त्यानंतर मृतदेहाला कसे चिरतात हे त्याने इंटरनेटवर पाहिले आणि त्याप्रमाणे शरीराचे तुकडे तुकडे केले मृतदेहाचा वास येईल म्हणून त्याने प्रथम आतड्यांची विल्हेवाट लावली आणि मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला हत्या करण्यासाठी आफताफने एक फूट लांब सुरीचा वापर केला होता.