महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satish Maneshinde : मराठा आरक्षण आंदोलकांचा खटला मोफत लढवणार; अ‍ॅड सतीश मानेशिंदे यांची माहिती - Lawyer Gunaratna Sadavarte

Satish Maneshinde : मी मराठा आहे, जातीसाठी धावून जाणं माझं कर्तव्य आहे. यापुढे मराठा आरक्षणातील आंदोलकांचे खटले आपण मोफत लढणार आहे, असं सांगत प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांनी आज मंगेश साबळे (Mangesh Sable) यांचं वकीलपत्र घेतलं आहे. साबळे यांनी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची गाडी फोडल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

Satish Maneshinde
अ‍ॅड सतीश मानेशिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 4:28 PM IST

मुंबई Satish Maneshinde : मुंबईतील अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची भोईवाडा येथे गाडी फोडण्यात आली आहे. गाडी फोडणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर या आंदोलकांच्या मदतीला प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांनी धाव घेतली आहे.


कोण आहे आंदोलक :छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे आणि वसंत बनसोडे, राजू सावे यांनी आज मुंबईतील परळ भोईवाडा येथे अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यापूर्वी अनेक हाय प्रोफाइल खटल्यांचा अनुभव असलेले अ‌ॅड. सतीश मानेशिंदे या तीन मराठा आंदोलकांच्या मदतीला धावून आले आहेत. सतीश मानेशिंदे हे अटक करण्यात आलेल्या तीन आंदोलकांचे वकीलपत्र घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


कृत्याचे समर्थन नाही: मराठा आंदोलकांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन आपण करणार नाही. मात्र, माझा त्यांना पाठिंबा आहे, असं सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं. म्हणजेच मानेशिंदे हे न्यायालयात मराठा आंदोलकांची बाजू मांडतील. यासाठी ते कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


कोण आहेत सतीश मानेशिंदे: सतीश मानेशिंदे हे देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cordelia Cruise Case) अभिनेता शाहरुख (Actor Shah Rukh Khan) खान याचा मुलगा आर्यन खान याचं वकीलपत्र घेतलं होतं. आर्यन याची तुरुंगातून सुटका होण्यात सतीश मानेशिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वीही त्यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढवले आहेत. यामध्ये बॉलीवूडच्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt) खटला लढवणाऱ्या वकीलांपैकी ते एक होते. संजय दत्तवर अत्यंत गंभीर आरोप असताना सतीश मानशिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर 2002 साली हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा खटला ते लढले होते. त्यांनी सलमानला जामीन मिळवून दिला होता. आता त्यांची मराठा आंदोलनात अप्रत्यक्षरित्या उडी घेतली आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ
  2. Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाची धग; सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू...
  3. Gunaratna Sadavarte News : स्वतःची कार जाळणाऱ्या 'त्या' मराठा कार्यकर्त्यानं फोडली सदावर्तेंची कार

ABOUT THE AUTHOR

...view details