महाराष्ट्र

maharashtra

लॉकडाऊन इफेक्ट : कामगारवर्गाचे वेतन न दिल्यास 'हा' वकील लढणार मोफत न्यायालयीन लढाई

By

Published : Apr 15, 2020, 8:44 AM IST

Updated : Apr 15, 2020, 11:57 AM IST

राज्य सरकारने सर्वांना पगार द्यावा असा आदेश दिला असला तरी मालक पगार देईल का, असा प्रश्न कामगारांना सतावत आहे. अशा कामगारांना मदत म्हणून वकील निखिल सोनावने हे पुढे आले आहेत व कामगारांचा पगार अडकवून ठेवणाऱ्यांची मोफत न्यायालयीन लढाई लढण्यास मदत करणार आहेत

कामगारवर्गाचे वेतन न दिल्यास हा वकील लढणार मोफत न्यायालयीन लढाई
कामगारवर्गाचे वेतन न दिल्यास हा वकील लढणार मोफत न्यायालयीन लढाई

मुंबई - देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये कामगार वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. तर, काहींचे 'वर्क फ्रॉम होम' या माध्यमातून काम सुरू आहे. काहींचे प्रकल्पच बंद असल्याने पगार मिळणार की नाही, या चिंतेत कामगारवर्ग आहे.

कामगारवर्गाचे वेतन न दिल्यास 'हा' वकील लढणार मोफत न्यायालयीन लढाई

राज्य सरकारने सर्वांना पगार द्यावा असा आदेश दिला असला तरी मालक पगार देईल का, असा प्रश्न कामगारांना सतावत आहे. अशा कामगारांना मदत म्हणून वकील निखिल सोनावने हे पुढे आले आहेत व कामगारांचा पगार अडकवून ठेवणाऱ्यांची मोफत न्यायालयीन लढाई लढण्यास मदत करणार आहेत

टाळेबंदी असल्यामुळे सर्व काही बंद आहे. ज्याप्रकारे हातावर पोट असणारे अडचणीत आले आहेत त्याचप्रकारे मध्यमवर्गीय देखील अडचणीत आले आहेत. अनेकजण खाजगी कंपनीत नोकरी करतात. काहींचे घराचे, कर्जाचे हप्ते चालू आहेत. राज्य सरकारने कोणाचे पगार अडवू नका, असे सांगितले आहे. मात्र, अनेक ठिकाणी आमच्यकडे पैसे नाही द्यायला, तुमचं काम बरोबर नाही, काम सोडा, अशा प्रकारचे कारण द्यायला सुरुवात केली आहे. या विरोधात अ‌ॅड निखिल सोनवणे यांनी आवाज उचलला आहे. जर तुमचा मालक किंवा कंपनी तुमचे पैसे अडकवत असेल तर, मला संपर्क करा असे आवाहन सोनावने यांनी केलं आहे.

टाळेबंदीमुळे अनेक धंदे ठप्प झाले आहेत. लोकांचे पगार अडकवायला काही जणांनी सुरुवात केली आहे. तर, काहिंना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. राज्य सरकारने पगार द्या असे सांगितले असतानाही काहीजण या निर्णयाविरोधात जाताना दिसत आहे. यामुळे जे पीडित आहेत अशा लोकांच्या बाजूने मी उभा राहणार आहे आणि त्यांना लागणारी मदत मी करणार आहे, असे सोनावणे म्हणाले. ज्या लोकांना पगार मिळत नाही आहे किंवा ज्यांचा पगार अडकवून ठेवण्यात आला आहे त्यांनी मला 9870187170 या क्रमांकावर संपर्क करावा, असे सोनावने यांनी सांगितले आहे.

Last Updated : Apr 15, 2020, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details